मुंबई: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून दक्षिण भारतातील अनेक भागात मंदोस चक्रीवादळाने धुमाकूळ घातला आहे. आता महाराष्ट्रावरही या चक्रीवादळाचे सावट असून काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळेल असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
हवामान विभागानुसार, मंदोस चक्रीवादळामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल. याशिवाय उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागात १५ डिसेंबरपर्यंत पावसाची शक्यता असून इतर ठिकाणी हवामान कोरडे राहिल, याशिवाय राज्यातील काही भागात थंडीचा कडाका वाढेल, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे.

दरम्यान, महाराष्ट्र राज्यातील काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल, असा इशारा हवामान खात्याने वर्तविला आहे.