मुंबई: आजचा दिवस इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. डिसेंबर महिन्यातील 12 तारीख ही देश विदेशाच्या इतिहासातील अनेक महत्त्वाच्या घटनांची साक्षीदार आहे. शरद पवार, गोपीनाथ मुंडे आणि रजनीकांत या सारख्या दिग्गजांचा जन्म आजच्याच दिवशी झाला. या व्यतिरिक्त इतिहासात आज कोणते महत्वाचे दिवस आहेत ते आपण या दिनविशेषच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
1232- गुलाम वंशाच्या इल्तमशने ग्वाल्हेरवर कब्जा मिळवला.

1800- वॉशिंग्टन डीसी अमेरिकेची राजधानी.
1822- मेक्सिकोला अमेरिकेची मान्यता.
1911- भारताची राजधानी कोलकात्यावरून दिल्लीला स्थलांतरित झाल्याची घोषणा.
1940- ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा जन्मदिन.
1949- भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा जन्मदिन.
1950- सुपरस्टार रजनीकांत यांचा जन्मदिन.
1963- केनिया स्वतंत्र झाला.
1971- संस्थानिकांचे तनखे रद्द करण्याचा इंदिरा गांधींचा धाडसी निर्णय.
1990- टी एन शेषन भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त.
1996- भारत आणि बांग्लादेशमध्ये 30 वर्षाच्या गंगा पाणी वाटप करारावर सह्या