Latest Marathi News

BREAKING NEWS

चंद्रावर जमीन खरेदी करता येईल? ; जाणून घ्या अधिक माहिती!

0 236

मुंबई: अंतराळातील चंद्रावर अमेरिका आणि चीन या दोन देशांचा झेंडा आहे. मात्र प्रश्न असा आहे की, चंद्रावर झेंडा फडकावून मालमत्तेवर दावा करता येत नसेल, तर मग तो कोणाच्या मालकीचा आहे?
मिसिसिपी युनिव्हर्सिटी ऑफ लॉ स्पेस तज्ज्ञ मिशेल हॅनलॉन म्हणतात की, या अवकाश करारामध्ये अंतराळातील जमीन ताब्यात घेण्याशी संबंधित नियम स्पष्ट केले आहेत. कराराच्या अनुच्छेद 2 नुसार, कोणताही देश अंतराळ किंवा खगोलीय क्षेत्राचा कोणताही भाग ताब्यात घेऊ शकत नाही. जगातील कोणताही देश चंद्रावर सार्वभौमत्वाचा दावा करू शकत नाही.

 

तसेच, कराराच्या कलम 3 मध्ये असे नमूद केले आहे की, सर्व लोकांना अवकाशात मालमत्ता बाळगण्याचा मूलभूत अधिकार आहे. कोणताही मनुष्य चंद्रावर घर बांधू शकतो आणि तो स्वतःचा दावाही करू शकतो. अनेक लोक चंद्राच्या काही भागांच्या मालकीचा दावाही करतात. तथापि, कलम 12 मध्ये असे लिहिले आहे की, इतर कोणत्याही खगोलीय ग्रहावरील कोणत्याही प्रकारची स्थापना सर्वांकडून वापरात असायला हवी असं म्हटलंय.

Manganga

 

दरम्यान, दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतने 2018 मध्ये चंद्रावर जमीन खरेदी केली होती. सुशांतने इंटरनॅशनल लूनर लँड्स रजिस्ट्रीमधून जमीन खरेदी केली होती. त्यांची ही जमीन चंद्राच्या ‘सी ऑफ मस्कोवी’मध्ये आहे. ही जमीन 25 जून 2018 रोजी त्यांच्या नावावर झाली होती.(सौ. abp माझा)

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!