आटपाडी : आटपाडी शहरातून दोन अल्पवयीन मुली गायब झाल्याच्या घटनेमुळे पालक वर्गामध्ये मोठी खळबळ माजली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, चौंडेश्वरी कॉलनी येथे राहण्यास असलेली अल्पवयीन मुलगी ही दिनांक १० रोजी रात्रीच्या सुमारास चोंडेश्वरी कॉलनी येथून गायब झाली असून ती अल्पवयीन असल्याचा कोणीतरी अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून पळवून नेली आहे.

तर प्रकाशवाडी येथे राहण्यास असलेली दुसरी अल्पवयीन मुलगी देखील रात्री १० रोजी रात्रीच्या सुमारास प्रकाशवाडी येथून गायब झाली असून ती अल्पवयीन असल्याचा कोणीतरी अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून पळवून नेली असल्याची फिर्याद दाखल झाली असून या प्रकारामुळे पालक वर्गामध्ये मोठी खळबळ माजली आहे.