पुणे: आज, रविवारी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास पुण्यातील मुळशी तालुक्यातील तैलबैला गडावर ट्रेक करताना रोप तुटल्याने २०० फूट खाली कोसळून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. कात्रज येथे राहणारा २५ वर्षीय सोमनाथ बळीराम शिंदे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, सोमनाथ आणि त्याच्या मित्रांचा ग्रुप तैलबैल येथे ट्रेकिंगसाठी आला होता. रात्री गावात मुक्काम केल्यानंतर पहाटे त्यांनी ट्रेकला सुरुवात केली. मात्र, सोमनाथ योग्य उपकरणांचा अभावामुळे खाली पडला. २०० फूट खाली पडल्यामुळे सोमनाथला गंभीर मार लागला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, अपघाताची माहिती समजताच लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्र या रेस्कू पथकाने यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर रेस्कू करत सोमनाथ शिंदे याचा मृतदेह बाहेर काढला.