Latest Marathi News

BREAKING NEWS

“कायदा फडणवीसांनुसार चालतो, कारण विरोधी पक्षातील नेता भाजपमध्ये गेल्यावर…”: ‘यांचे’ मोठे वक्तव्य!

0 404

मुंबई: भाजप नेते, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शाईफेकीनंतर शाई फेकणाऱ्या मनोज गरबडे याच्यावर कलम ३०७ अंतर्गत हत्येचा प्रयत्न करणे असे आरोप एफआयआर रिपोर्टमध्ये लावण्यात आले आहे. यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केलेली होती. पिंपरी-चिंचवडमध्ये झालेली घटना अयोग्य होती. आपण त्याचा निषेध करू शकतो. मात्र, शाईफेक करणं या गोष्टीच समर्थन होऊ शकत नाही. शाई फेकणं आपली संस्कृती नाही’.

Manganga

 

तसेच त्या पुढे म्हणाल्या, ‘ मला वाटत कायदा आता गृहमंत्र्यांच्या मर्जीनुसार चालतो. जो विरोधात बोलतो, त्यांच्या विरोधात ईडी लावली जाते. ईडीच्या केस या केवळ विरोधी पक्षातील नेत्यांवरच आहे. विरोधी पक्षातील नेता भाजपमध्ये गेल्यावर त्याला वाशिंग मशीन सारखा साफ होऊन क्लीन चिट दिली जाते’, असे वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!