धुळे : एका तरुणाच्या गुदद्वारात त्याच्याच सोबतच्या कर्मचार्यांनी प्रेशर नळी लावुन हवेचा प्रेशर वाढविला. हवेच्या प्रेशरने तरुणाच्या पोटातील आतड्या तुटल्याने तरुणाचा मृत्यू झाला आहे. तुषार निकुंभ असे मृत तरुणाचे नाव आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, साक्री तालुक्यातील छडवेल कोर्डे येथील सुजलॉन कंपनीत काम करणाऱ्या तरुणाच्या गुदद्वारात त्याच्याच सोबतच्या कर्मचार्यांनी प्रेशर नळी लावुन हवेचा प्रेशर वाढविला. या तरुणाला या सर्व प्रकारानंतर त्रास होऊ लागला आणि त्यानंतर त्याला तात्काळ नंदुरबार येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु त्याची प्रकृती आणखीनच बिघडल्यामुळे तेथून नातेवाईकांनी सुरत येथे उपचारासाठी नेले असता उपचारादरम्यान सुरत येथील रुग्णालयात या तरुणाचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून, संबंधित कंपनीतील कर्मचाऱ्यांनी जबरदस्तीने हा प्रकार केल्याने यात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.