मुंबई: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामुळे काही आंबेडकरी विचारांच्या तरुणांनी त्यांच्यावर काल, शनिवारी पुण्यात शाईफेक केली होती. शाईफेक झाल्यानंतर चंद्रकांत पाटील माध्यमांशी बोलताना आक्रमक झाले होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी मला वारंवार टार्गेट करते. मी गिरणी कामगाराचा मुलगा आहे, म्हणून हे त्यांच्या डोळ्यात खुपतं. पवार घराणं, ठाकरे घराणं मला टार्गेट करते. संजय राऊत, आदित्य ठाकरे, नव्याने आलेल्या सुषमा अंधारे मला टार्गेट करतात. यांना महाराष्ट्रात घराणेशाही आणायची आहे.
तसेच ते पुढे म्हणाले, “मी कुणालाही घाबरणार नाही, मी चळवळीतून आलेलो आहे. मी पवारांना डायरेक्ट चॅलेंज करतो की, तुमची सगळी प्रकरणं बाहेर काढणार असं थेट आवाहन चंद्रकांत पाटील यांनी पवार घराण्याला दिले आहे.
