व्हिडीओ !उर्फी जावेद चक्क साडीत; तरीही ‘ही कधीच सुधारणार नाही’ अशा युझर्स च्या प्रतिक्रिया; नक्की झाल काय?
मुंबई: टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या चित्रविचित्र फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. उर्फीला नेटकऱ्यांनी कधीच साध्या कपड्यांमध्ये पाहिलं नाही. त्यामुळे जेव्हा कधी ती साडी नेसलेली पहायला मिळते, तेव्हा नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो. उर्फी नुकतीच मुंबई एअरपोर्टवर साडी नेसून पोहोचली होती.उर्फीला साडीत पाहून नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं. तिच्या या लूकची काहींनी प्रशंसासुद्धा केली.
या व्हिडीओ मध्ये फोटोग्राफर्स आणि पापाराझींना पिझ्झा वाटल्यानंतर उर्फीने फोटोसाठी पोझ दिले. मात्र एअरपोर्टवर हवा इतकी होती, की त्यामुळे तिच्या साडीचा पदरच उडू लागला. एअरपोर्टच्या गेटच्या आत जाईपर्यंत साडीचा पदर सांभाळायला उर्फीला चांगलीच कसरत करावी लागली. अखेर एका महिलेनं तिची मदत केली. दरम्यान, उर्फीला पूर्ण कपड्यांमध्ये क्वचित पाहिलं जातं. मात्र साडी नेसल्यानंतरही तिचा पदर सारखा उडत असल्याने नेटकऱ्यांनी पुन्हा तिला ट्रोल केलं.

त्यामुळे, “सुरुवातीला वाटलं की हिला आज काय झालं? पण नंतर पूर्ण व्हिडीओ पाहून समजलं की ही कधीच सुधारणार नाही”, असं एकाने म्हटलं. तर उर्फीच्या शरीराला पूर्ण कपडे घालायची सवय नाही, अशी खिल्ली दुसऱ्या युजरने उडवली. उर्फीकडे साधं एक सेफ्टी पिन नव्हतं का, इतकी गरीब आहे का ही, अशीही टीका नेटकऱ्यांनी केली. कदाचित तिला सेफ्टी पिन्सविषयी माहीतच नसेल, अशा अनेक प्रतिक्रिया उर्फिच्या या व्हायरल व्हिडीओवर येत आहेत.