Latest Marathi News

पंतप्रधान मोदींनी दिली महाराष्ट्रातल्या ताऱ्यांची माहिती;म्हणाले….!

0 283

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज समृद्धी महामार्गाचं लोकार्पण केलं. यावेळी मोदींच्या हस्ते 75 हजार कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण झालं.विविध विकासकामांना मोदींना नक्षत्राची उपमा दिली.

 

यावेळी मोदी म्हणाले,“आज महाराष्ट्राच्या विकासासाठी एक मोठं नक्षत्र उदयास येत आहे.स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या 75 वर्षात 75 हजार कोटींची विकासकामे झाल्याबद्दल महाराष्ट्राचे आणि महाराष्ट्रातील जनतेचे पंतप्रधान मोदींनी अभिनंदन केले. डबल इंजिनचे सरकार महाराष्ट्रात किती वेगाने काम करत आहे, याचा हा पुरावा आहे.

Manganga

 

तसेच त पुढे म्हणाले, “पहिला तारा हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग. दुसरा तारा नागपूर एम्स आहे, ज्याचा लाभ विदर्भातील मोठ्या भागातील लोकांना होईल. तिसरा तारा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वन हेल्थची स्थापना आहे. चौथा तारा रक्तासंदर्भातील रोगांच्या नियंत्रणासाठी चंद्रपुरात बनलेलं आयसीएमआरचं रिसर्च सेंटर, पाचवा तारा पेट्रोकेमिकल क्षेत्रासाठी खूपच महत्वाचा सीपेट चंद्रपूर. सहावा तारा नागपुरात नाग नदीचं प्रदुषण कमी करण्यासाठी सुरु झालेला प्रकल्प, सातवा तारा नागपूरमध्ये मेट्रो फेज वनचा लोकार्पण आणि दुसऱ्या फेजचं भूमिपूजन, आठवा प्रकल्प नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेस, नववा तारा नागपूर-अजनी रेल्वे स्टेशनचा विकास प्रकल्प, दहावा तारा अजनीमध्ये बारा हजार हॉर्सपॉवरच्या इंजिनाच्या देखभाल प्रकल्प, बारावा तारा नागपूर-इटारसी लाईनवर कोली नरके मार्गाचं लोकार्पण आहे, असे मोदींनी म्हटले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!