मुंबई: अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू विराट कोहली यांची प्रेमकहाणी लग्नाआधी आणि लग्नानंतर बरीच चर्चेत आहे. या दोघांनीही एकमेकांना ११ डिसेंबर २०१७ ला इटलीमध्ये सात जन्म एकमेकांसोबत राहण्याचे वचन दिले होते.
बऱ्याचदा अनुष्का विराटची मॅच पाहण्यासाठी पोहोचली होती, तिथे ही ती कॅमेऱ्याच्या गऱ्हाळ्यात दिसली होती. पण विराटच्या आधीही अनुष्का एका बॉलिवूड कलाकाराच्या आणि एका क्रिकेट खेळाडूच्या प्रेमात पडली होती.

२०१० मध्ये अनुष्का आणि रणवीरने ‘बँड बाजा बरात’ हा चित्रपट केला होता. चित्रपटादरम्यान अनुष्का आणि रणवीरचं सुत जुळल्याची चर्चा होत होती. पण त्यांचे नाते फार काळ टिकले नाही. त्यानंतर बॉलिवूडमध्ये अनुष्काने पदार्पण केल्यानंतर काही वर्ष एका आजारासोबत झुंज देत होती. पण या सगळ्यात 2012 मध्ये सोशल मीडियावर अशी बातमी आली की, अनुष्का क्रिकेटर सुरेश रैनाला डेट करत आहे. परंतु त्यांची प्रेमकहाणी संपुष्टात आली.
दरम्यान, अनुष्का विराटच्या प्रेमात पडली. त्यांच्या जोडीला सर्वत्र प्रेमही मिळाले. 11 डिसेंबर 2017 रोजी दोघांनी इटलीत मोठ्या थाटामाटात पण मोजक्याच मंडळींमध्ये लग्न उरकले. 11 जानेवारी 2021 रोजी अनुष्काने एका गोंडस मुलीला जन्म दिला, त्यांनी तिचे नाव वामिका असे ठेवले.