जळगाव : जळगाव जिल्हाा दूध संघ निवडणूकीत खडसेंचा पराभव करत भाजप, शिंदे गटाने बाजी मारली आहे. या निकालानंतर प्रतिक्रीया देताना गुलाबराव पाटील बोलत होते.
पाटील म्हणाले, “उत्तर महाराष्ट्र राष्ट्रवादीमय करून टाकण्याचे आश्वासन शरद पवारांना देत भाजपमधून राष्ट्रवादी प्रवेश करणाऱ्या एकनाथ खडसेंसोबत राष्ट्रवादीचे निम्मे कार्यकर्ते नाहीत. अर्थात एकनाथ खडसे यांना असलेल्या विरोधामुळे राष्ट्रवादी देखील संपण्यात जमा असल्याचा आरोप गुलाबराव पाटील यांनी केला.

दरम्यान, शंभर टक्के ग्रामपंचायत राष्ट्रवादीने विजय केले असून शिवसेनेला तिथं कुठेही यश मिळाले नसल्याचा पलटवार एकनाथ खडसे यांनी केला आहे.