मुंबई: सध्या सोशल मीडियावर ‘पतली कमरिया’ गाण्याचा एक ट्रेंड सुरु आहे. सध्या अशाच एका मुलाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्याने रिल्स बनवण्यासाठी चक्क टॉयलेट सीटवर डान्स केल्याचं पाहायला मिळतं आहे.
या व्हिडिओमध्ये एक विद्यार्थी डान्स करण्यासाठी चक्क टॉयलेटच्या सीटवर चढल्याचं दिसतं आहे. शिवाय ‘पतली कमरिया’ गाण्याच्या ट्रेंडनुसार त्याचे इतर मित्रपण त्याच्या डान्सला दाद देताना दिसतं आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरलं होतं आहे. पण या विद्यार्थ्यांना हे डान्स करणं चांगलच अंगलट आल्याचंही दिसतं आहे. ते कसं तुम्ही व्हिडीओमध्येचं पाहा.

दरम्यान, हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर bhutni_ke_memes नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. अनेक नेटकरी यावर हासण्याच्या इमोजी कमेंट करत आहेत.