जळगाव : शहरातील तानाजी मालुसरे नगरातील देविदास भावराव कोळी (वय ३५) या गृहस्थाने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केली.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, जळगाव शहरातील आसोदा रोडवरील तानाजी मालुसरे नगरात देविदास कोळी हे कुटुंबीयांसह वास्तव्यास होते. त्यांना तीन मुली, एक मुलगा असा परिवार पत्नी माहेरी निघून गेल्यानंतर देविदास कोळी तणावात होते. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ते घरातून निघून गेले होते. मध्यरात्रीच्या सुमारास त्यांनी आसोदा रेल्वे गेटजवळ दुचाकी लावून त्यांनी जळगाव- भादली रेल्वेलाईन खांबा क्र. ४२२ जवळ धावत्या रेल्वेखाली स्वत:ला झोकून देत आत्महत्या केली.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले.मयताच्या अंगझडतीत पँटच्या खिशात पाकिट सापडले. त्यावरुन त्याची ओळख पटली. नैराश्यातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असावे असे, परिचीतांनी पोलिसांना माहिती देताना सांगितले.