मुंबई: महाराष्ट्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज समृद्धी महामार्गाचं लोकार्पण करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, ११ डिसेंबरला सकाळी ९ः३० वाजता नागपूरात दाखल झाले. यावेळी त्यांनी अगोदर वंदे भारत ट्रेनला हिरवा कंदील दाखवला. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी फ्रीडम पार्क मेट्रो स्थानकापासून खापरी मेट्रो स्थानकापर्यंत मेट्रोमधून प्रवास केला. या प्रवासानंतर त्यांनी ‘नागपूर मेट्रो टप्पा -दोन’ ची पायाभरणीही केली.
ठरलेल्या वळेनुसार सकाळी ११ः३० वाजता मुंबई-नागपूर या समृद्धी महामार्गाचं लोकार्पण केलं आहे. समृद्धी महामार्गाचं लोकार्पण केल्यानंतर त्यांनी याच समृद्धी महामार्गावरुन १० किलोमीटरपर्यंत प्रवास केला आहे.

दरम्यान, यावेळी पंतप्रधान मोदींसह राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. (सौ. साम)