मुंबई: भाजप नेते तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांनी औरंगाबादेत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ‘ त्यानंतर काल शनिवारी पिंपरी-चिंचवडमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. या शाईफेक प्रकरणी १ पोलीस निरीक्षक २ दोन उपनिरीक्षक आणि ७ कर्मचाऱ्यांना पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी तडकाफडकी निलंबीत केलं आहे.
माहितीनुसार, पोलीस निरीक्षक सतीश नांदूरकर आणि पोलीस उपनिरीक्षक प्रदीपसिंग सिसोदे, गणेश माने यांच्यासहीत ७ पोलिस कर्मचाऱ्यांना पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी निलंबीत केले आहे.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी या शाईफेक हल्ला प्रकरणी कोणत्याही पोलिसाला निलंबीत करुनये अशी विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली होती.परंतु हा त्यांनी निर्णय घेतला आहे.