मुंबई: भाजप नेते, मंत्री चंद्रकात पाटील यांनी काल औरंगाबादेत महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आज, शनिवारी पिंपरी-चिंचवडमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शाईफेक करण्यात आली आहे.या घटनेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री यांनीही या घटनेबाबत नाराजी व्यक्त करत शाईफेकीला विरोध दर्शवला आहे.
फडणवीस म्हणाले, चंद्रकांत पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही अश्या पद्धतीने टार्गेट करणं हे अयोग्य नाही. ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. शब्द चुकला असेल तरी आशय लक्षात घेतला पाहिजे. मी माध्यमांना दोष देत नाही पण आशय दाखवायला पाहीजे. जे आंदोलन करत आहे. अशा पद्धतीचे राजकारण बरोबर नाही. आम्हीदेखील विरोधी पक्षात होतो, सीमा प्रश्नापेक्षा यावर राजकारण जास्त होत आहे असे फडणवीस म्हणाले आहेत.
