“शिवसेना उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी समोर येऊन….”: शाईफेकीच्या घटनेनंतर चंद्रकांत पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
मुंबई: भाजप नेते तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांनी काल औरंगाबादेत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आज, शनिवारी पिंपरी-चिंचवडमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. या हल्ल्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, मी दोन-तिनदा स्पष्टीकरण देऊनही माझ्यावर शाई फेकून हल्ला करण्यात आला. हे अतिशय निंदनीय आहे, आम्ही कायदा व सुव्यवस्था हाती घेणार नाही. आमच्या प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं तर आम्ही रस्त्यावर उतरुन या हल्ल्याचा निषेध करू असं देखील चंद्रकांत पाटील म्हणाले.
तसेच शिवसेना उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी समोर येऊन या हल्ल्यासंदर्भात आपलं मत व्यक्त करावं असं आव्हान देखील चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

दरम्यान घटनेनंतर शाईफेक करणाऱ्याला चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे. तसेच, चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेकीच्या घटनेनंतर भाजप नेते आक्रमक झाले आहेत.