आटपाडी: अंडं आधी की कोंबडी? हा प्रश्न नेहमीच आपल्याला बुचकळ्यात टाकतो. कुणी म्हणतं अंडं तर कुणी म्हणतं कोंबडी.परंतु, याच प्रश्नाचे उत्तर अखेर सापडलं आहे. अंडं आधी की कोंबडी यावर यूकेतील शेफील्ड आणि वारविक युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापकांनी शोध सुरू केला. संशोधनानुसार जगात अंड्याआधी कोंबडी आली होती.
संशोधनानुसार, अंड्याच्या कवचेत एक ओवोक्लाइडिन नावाचं प्रोटिन असतं. याशिवाय अंड्याचं कवच बनू शकत नाही. हे प्रोटिन फक्त कोंबडीच्या गर्भाशयात तयार होतं. जेव्हा कोंबडीच्या गर्भाशयातील प्रोटिनचा अंड्याच्या निर्मितीत वापर होतो, तेव्हाच अंडं बनू शकतं.त्यामुळे जगात अंड्याआधी कोंबडी आली हे पक्कं झालं आहे. जेव्हा कोंबडी आली तेव्हाच तिच्या गर्भाशयात ओवोक्लाइडिन बनलं आणि मग या प्रोटिनमुळे अंड्याची निर्मिती झाली.

दरम्यान, , जगात आधी कोंबडी आली आणि त्यानंतर अंडं हे स्पष्ट झाले आहे.