नवी दिल्ली: भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या पहिल्या महिला अध्यक्षपदी पीटी उषा यांची आज (शनिवार) अधिकृतपणे निवड करण्यात आली. प्रशासकीय मंडळाच्या निवडणुकीत निवडून आल्या.
माहितीनुसार, 58 वर्षीय उषा यांनी अनेक आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले आहे. लॉस एंजेलिस ऑलिम्पिक (सन 1984) मध्ये चारशे मीटर अडथळा अंतिम फेरीत चौथे स्थान पटकावले हाेते. या निवडणुकीत सर्वोच्च पदासाठी बिनविरोध निवडून आल्याचे घोषित करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेले निवृत्त न्यायमूर्ती एल नागेश्वर राव यांनी निवडणुक निरिक्षक म्हणून काम पाहिले.

दरम्यान, IOA चे इतिहासात संघटनेचे नेतृत्व करणारी उषा या पहिली ऑलिंपियन ठरली आहे. पीटी उषा यांच्या निवडीमुळे देशाच्या क्रीडा क्षेत्रातील प्रशासनात एक नवीन युग सुरू झाल्याचे बाेलले जात आहे.