“आम्हाला चार चार मुले झाली ही चूक आमची नाही तर कॉंग्रेस सरकारने त्याचवेळी….”: ‘या’ खासदाराचे मोठे वक्तव्य!
मुंबई:गेल्या काही दिवसांपासून देशात लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू करण्याची चर्चा सुरू आहे. केंद्र सरकारसह अनेक भाजपा नेते यासाठी आग्रही आहेत. तसेच, गोरखपूर मतदार संघाचे विद्यमान खासदार रवी किशनही या संबंधित नेहमी आपली बाजू मांडताना दिसत असतात. याच संदर्भात बोलताना रवी किशन मोठा दावा केला आहे.
रवी किशन म्हणाले की, “मला चार मुले आहेत. या चार मुलांचे पालन पोषण करताना किती कष्ट लागतात याचा मला अनुभव आहे. माझी पत्नी आधी सडपातळ होती मात्र दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर तिची प्रकृती खराब होत गेली. मी त्यावेळी संघर्ष करत होतो. त्यामुळे नेहमीच शुटिंगमध्ये व्यस्त असायचो, त्यावेळी कोणतीही माहिती नव्हती, परंतु आता मी माझ्या पत्नीकडे पाहतो तेव्हा वाईट वाटते. आम्हाला चार चार मुले झाली ही चूक नाही.

तसेच ते पुढे म्हणाले, “कॉंग्रेस सरकारने त्याचवेळी जनसंख्या नियंत्रण कायदा आणला असता तर आम्हाला चार मुले झाली नसती. या कायद्यासंदर्भात कॉंग्रेसने जनजागृती न केल्यानेच भाजपा हे विधेयक आणणार आहे”, असे त्यांनी वक्तव्य केले.
दरम्यान, रवी किशन यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.