ठाणे: उल्हासनगरमध्ये मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत वसलेल्या सचदेव नगर परिसरात चौघांनी मिळून एका तरुणावर धारदार हत्याराने वार केले. या हल्ल्यात सदर तरुण बचावला असून त्याच्यावरती उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रथम संदीप गायकवाड असे जखमी तरुणाचे नाव आहे.
याबद्दल अधिक माहिती असशी कि, काल रात्री प्रथम त्याच्या घराजवळ असलेल्या रस्त्यावर उभा होता. त्यावेळी चार अज्ञात तरुण दुचाकीवरून त्याच्या दिशेने आले. ते आपल्याला मारण्यासाठी येत आहेत याचा अंदाज प्रथमला आला होता. त्याने लगेचच तिथून पळ काढला. मात्र हल्लेखोरांनी त्याला गाठले आणि त्याला अमानुष मारहाण केली. या घटनेत प्रथमच्या पोटात, हाता पायावर आणि मानेवर त्यांनी चाकूने वार केले. तसेच लाथा बुक्क्यांनी त्याला मारहाण केली. त्यानंतर चौघांनी तेथून पळ काढला.

दरम्यान, दोन वर्षां आधी प्रथमचे वडिल संदीप गायकवाड यांच्यावर देखील आरोपींनी गोळीबार केला होता. मात्र त्यातून ते बचावले होते. त्यामुळे हल्लेखोरांनी वडिलांवरचा राग मुलावर काढण्याचा प्रयत्न केला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. सदर घटनेत पोलीस अधिक तपास करत आहेत.