पंढरपूर: पंढरपूर विकासाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने पंढरपुरात उज्जैनच्या धर्तीवर कॉरिडॉर करण्याचे निश्चित केले आहे. मात्र या कॉरिडॉरमध्ये मंदिर परिसर व प्रदक्षिणामार्गाच्या आतील सुमारे पाचशेहून अधिकची घरे भूसंपादित होण्याची शक्यता असल्याने पंढरपूर कॉरिडोरला विराेध हाेऊ लागला आहे. दरम्यान, विराट हिंदुस्थानचे अध्यक्ष डॉ सुब्रमण्यम स्वामी यांनी देखील यास याबाबत ट्विट करत कडाडून विरोध केला आहे.
या ट्विटमध्ये माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे रावण आहे, कारण त्यांचा काशी वाराणसी उध्वस्त केल्यानंतर पंढरपूर उध्वस्त करण्याचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

दरम्यान,राज्य सरकारला कॉरिडोर न करण्याची मागणी करण्यात येईल. त्यांनी न ऐकल्यास न्यायालयात कॉरिडोर विरोधात याचिका दाखल करु असे डॉ. स्वामी यांनी म्हटले आहे.