“…असे अनेक बोम्मई पाहिले आहेत, अमित शहा त्यांना सरळ केल्याशिवाय राहणार नाहीत”: ‘या’ शिंदे गटाच्या नेत्याचे मोठे वक्तव्य!
जळगावः कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज सकाळीच सीमाप्रश्नावरून महाराष्ट्राच्या नेत्यांनी अमित शहांची भेट घेऊन काही फरक पडणार नाही, असं ट्वीट बसवराज बोम्मई यांनी केलं होतं. तर लवकरच कर्नाटकचे शिष्टमंडळही अमित शहांची भेट घेणार असल्याचे बोम्मई म्हणाले. यावर गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले, ‘ अमित शहा यांच्या भेटीनंतरही काही फरक पडणार नाही, अशी भाषा म्हणजे उन्मादाची बाब आहे. अमित शहा हे देशाचे गृहमंत्री आहेत सर्वात मोठ्या पक्षाचे ते दोन वेळेस अध्यक्ष राहिलेले आहेत. कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. अशा परिस्थितीत त्यांनी तडजोडीची भूमिका घेतल्यावरही आम्ही काहीच करू देणार नाही, याचा अर्थ याला रगड म्हटल जातं, अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक बोम्मई पाहिले आहेत, ते त्यांना सरळ केल्याशिवाय राहणार नाहीत अशी खात्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली.
