मुंबई: महाराष्ट्राच्या लावणीसम्राज्ञी आणि ज्येष्ठ पार्श्वपगायिका सुलोचना चव्हाण यांचे निधन झाले आहे.
माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून सुलोचना चव्हाण यांची प्रकृती खालावली होती. सुलोचना चव्हाण यांचे आज दुपारी 12 च्या सुमारास मुंबईतील गिरगावमधील फणसवाडी येथील निवासस्थानी वयाच्या 92 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.

दरम्यान, सुलोचना चव्हाण यांचा भारत सरकारने पद्मश्री देऊन सन्मान केला होता. तसेच, त्यांनी साठ वर्षांहून अधिक काळ त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.