Latest Marathi News

BREAKING NEWS

“शिंदे गटाची निशाणी कुलूप असायला हवी, कारण त्याची चावी दिल्लीकडे….”:संजय राऊतांचा हल्लाबोल!

0 123

मुंबई : महाराष्ट्र कर्नाटक-सीमाप्रश्न दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. यातच आता कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई महाराष्ट्राला डिवचण्याचं काम करत आहेत. याच मुद्द्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष केलं आहे.

 

राऊत म्हणाले, “कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलतात त्याच्याशी महाराष्ट्राला पडलेला नाही. परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बोम्मई यांना कशाप्रकारे उत्तर देतात? मुख्यमंत्री या लढ्यात उतरले आहेत की नाहीत कुठे आहेत, हा प्रश्न आहे. कर्नाटकच्या प्रश्नावरती महाराष्ट्राच्या तोंड उघडलेलं नाही. काल देखील आमचे खासदार हे अमित शहा यांना भेटले आहेत. मिंदे सरकारचे खासदार यावरती गप्प बसलेले आहेत, असा घणाघात संजय राऊतांनी केला आहे.

Manganga

 

बोम्मई म्हणतात एक इंचही जमीन देणार नाही, अमित शाह यांचं ऐकणार नाही. मग अमित शाह नेमकी काय मध्यस्थी करणार आहेत?’ असं संजय राऊत म्हणाले.

 

तसेच ते पुढे म्हणाले, ‘शिंदे गटाची निशाणी ढाल-तलवार नसून कुलूप असायला हवी. त्याची चावी दिल्लीकडे आहे. दिल्लीवाले जेव्हा कुलूप उघडतील, तेव्हा हे बोलतील. पण त्यांच्यात बोलण्याची हिंमत नाही. काल सुप्रिया सुळेंनी जोरदार भूमिका मांडली. तेव्हा हे सगळे कुठे होते?’, असा सवाल देखील संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!