मुंबई: लग्न झालेल्या जोडप्यांसाठी केंद्र सरकारकडून अनेक सरकारी योजना राबविण्यात येतात. दरम्यान, PM वय वंदना योजना (प्रधानमंत्री वय वंदना योजना), ज्यामध्ये तुम्हाला वृद्धापकाळात दर महिन्याला पैसे मिळतील. ३१ मार्च २०२३ पर्यंत तुम्ही या सरकारी योजनेचा लाभ घेऊ शकता.
माहितीनुसार, ही एक प्रकारची पेन्शन योजना आहे, जर या योजनेत कोणत्याही पती-पत्नीने प्रत्येकी 15 लाखांची गुंतवणूक केली, म्हणजे एकूण 30 लाखांची गुंतवणूक केली, तर तुम्हाला 7.40% दराने व्याजाचा लाभ मिळेल. या रकमेवर तुम्हाला व्याजातून 2,22000 रुपये वार्षिक उत्पन्न मिळेल. जर ही व्याजाची रक्कम 12 महिन्यांत विभागली गेली तर तुम्हाला दरमहा 18500 रुपये मिळतील आणि ही रक्कम तुमच्या खात्यात पेन्शन म्हणून येईल.

दरम्यान, या योजनेचा परिपक्वता कालावधी 10 वर्षांचा आहे. जर तुम्ही त्यात 10 वर्षांसाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला तुमचे गुंतवलेले पैसे 10 वर्षांनंतर परत मिळतील.