मुंबई: राम गोपाल वर्माचा आगामी चित्रपट ‘डेंजरस’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. राम गोपाल वर्मा आपल्या चित्रपटांच्या प्रमोशनसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात, त्यामुळे ते वादातही अडकतात. अशाच त्यांचा एका विचित्र कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
माहितीनुसार, राम गोपाल वर्मा ‘डेंजरस’च्या प्रमोशनसाठी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करत आहेत. ते ‘डेंजरस’ चित्रपटातील अभिनेत्रीच्या पायाला मसाज देताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये ते खाली बसले आहेत. तसेच अभिनेत्री आशु रेड्डी सोफ्यावर बसली आहे. तर राम गोपाल वर्मा तिच्या पायाला किस करताना दिसत आहेत. ट्विटर अकाऊंटवर एक फोटो शेअर करत दिग्दर्शक राम गोपाल वर्माने लिहिले की, ‘डेंजरस मार्क कहां है, 9:30 वाजता.’ फोटोमध्ये राम गोपाल वर्मा अभिनेत्रीचा पाय हातात धरून खाली बसले आहेत आणि कॅमेराकडे पाहत आहेत.

Where is the DANGEROUS mark in ASHU REDDY ..Full video in 30 mints at 9.30 pm pic.twitter.com/34lp6eHjC5
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) December 6, 2022
दरम्यान, राम गोपाल वर्माच्या या पोस्टवर एकाने युजरने लिहिले की, ‘रामू सरांना असे पाहताना मला वाईट वाटत आहे, एकेकाळी ते भारतीय चित्रपटसृष्टीचे सर्वोच्च दिग्दर्शक होते, ज्यांच्यासोबत सर्व मोठे कलाकार काम करायचे होते.’ दुसऱ्याने लिहिले, ‘हे काय रामू, तू असा नव्हतास, उठ, अशा प्रतिक्रिया युझर्स कडून मिळत आहेत.