“चंद्रकांत पाटील यांनी ‘यासाठी’ देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भीक मागितली”: अमोल कोल्हेचा ‘त्या’ वक्तव्यावरून हल्लाबोल!
मुंबई: मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्यावर केलेल्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा समाचार राष्ट्रवादाचे आमदार अमोल मिटकरी आणि राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी घेतला आहे.
मिटकरी म्हणाले,’भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी मंत्रिपद मिळावे यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भीक मागितली होती. तशी महामानवांनी शाळा सुरू करण्यासाठी भीक मागितली नाही. लोकांकडून वर्गणी गोळा करून त्यांनी शाळा सुरू केल्या, तसेच, भाजप नेत्यांच्या मस्तकातील घाण काढण्यासाठी गाडगे बाबांचा झाडू हाती घ्यावा लागेल, असा इशारा देखील अमोल मिटकरी यांनी दिला.

दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आज पंढरपुरात बोलत होते.