सांगली : सांगली जिल्ह्यातील निवडणूक लागलेल्या ४४७ ग्रामपंचायतीपैकी ३८ ग्रामपंचायतीचे सरपंच बिनविरोध झाले आहेत. अनेक ग्रामपंचायतीमधील ५७० सदस्य बिनविरोध झाले आहेत.
माहितीनुसार, सांगली जिल्ह्यातील सरपंच पदाच्या ४०९ जागांसाठी १ हजार १२० तर ४ हजार १४६ सदस्य पदांसाठी तब्बल ८ हजार ६०४ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. दरम्यान सरपंच पदाचे १ हजार ३०२ व सदस्य पदासाठीच्या ५ हजार ५६६ जणांनी निवडणुकीतून माघार घेतली.
दरम्यान, येलूर, कोळे, धोत्रेवाडी, गौडवाडी, विठ्ठलवाडी, शिवपुरी, भरतवाडी, कोकरुड, शिवरवाडी, भैरेवाडी, फुपिरेचे सरपंच आणि चिखली, खुंदलापूर, वाकाईवाडी आणि शिंदेवाडी ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या.