मुंबई: नागरिक कडाक्याच्या थंडीने त्रस्त असतानाच काही राज्यांसाठी आणखी एक धोक्याची घंटा वाजली आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेले मंदोस चक्रिवादळ ९ डिसेंबरच्या रात्री आंध्रप्रदेशमधील श्रीहरीकोटा आणि पाँडिचेरीच्या मधून जाणार असल्याने तमिळनाडूमधील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राचे ६ डिसेंबरला खोल दाबात रुपांतर झाले होते. हे वादळ बुधवारी चेन्नईपासून ७५० किमी दूर होते.त्याआधीच प्रशासनाने सुरक्षिततेची आवश्यक ती खबरदारी घेण्यास सुरूवात केली आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिता लक्षात घेत शाळा आणि महाविद्यालयांची घोषणा करण्यात आली आहे.

दरम्यान, किनारपट्टीवरील तामिळनाडू, पाँडेचेरी आणि कराईकलमध्ये काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळेच या भागातील लोकांना सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.