बीड: शहराजवळील समनापूर येथे एका नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने तरुणाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे. सुमित्रा राजू ईटकर (वय 22 वर्षे, रा. हिरापूर ता. गेवराई, हमु. बीड) असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून, किशोर कचरू साठे (रा. गौतम बुध्द कॉलनी, बीड) व सम्यक संजय पारवे (रा. राजीव गांधी चौक, बिंदुसरा कॉलनी, हमु, मित्रनगर, बीड) यांचा आरोपींचे नाव आहे.
माहितीनुसार, सुमित्रा ही बीएस्सी नर्सिंगचे शिक्षण घेत होत होती. तीन वर्षापासून तिची किशोर साठेशी ओळख होती. या ओळखीतून तो तिच्याकडे सतत लग्नाची मागणी करत होता. तसेच, माझ्याशी लग्न कर अन्यथा तुला पळवून नेईन व जीवे मारून टाकीन, अशी धमकी किशोर साठे देत सुमित्रा देत होता. याचवेळी किशोरचा मित्र सम्यक पारवे यानेही सुमित्राला लग्न करण्याकरता तिच्यामागे तगादा लावला होता. त्यामुळे या दोघांच्या जाचास कंटाळून अखेर सुमित्राने समनापूर शिवारात जाऊन एका विहिरीत उडी घेत आत्महत्या केली.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पंचनामा करुन मृतदेह नातेवाईकांकडे सोपवण्यात आला आहे. तर मयत सुमित्राची बहीण संगीता लष्करे (रा. हिरापूर सोन्याबापू लष्करे ता. गेवराई हमु, वंजारवाडी ता. गेवराई) यांच्या फिर्यादीवरुन बीड ग्रामीण ठाण्यात किशोर साठे व सम्यक पारवे यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला.