Latest Marathi News

BREAKING NEWS

युट्यूबवर ‘ती’ जाहिरात पाहिली अन् परीक्षेत नापास; तरुणाची न्यायालयात याचिका दाखल!

0 272

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयात युट्यूबवर अश्लील याचिका पाहून अभ्यासातून मन उडाल्याचा दावा एका तरुणाने केला. त्यामुळे आपल्याला युट्यूबने भरपाई देण्याची मागणीही या तरुणाने केला. जस्टिस संजय किशन कौल यांच्या बेंच समोर ही याचिका ठेवण्यात आली होती. मध्यप्रदेशातील रहिवासी आनंद किशोर चौधरी असं या याचिकाकर्त्याचं नाव आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने त्याची याचिका फेटाळून लावत त्याला 25 हजारांचा दंडही ठोठावला.

 

याबद्दल अधिक माहिती अशी कि, युट्यूबवर अश्लील जाहिराती येत असल्याने परीक्षेच्या काळात अभ्यासावरून मन उडाल्याचं या याचिकेत म्हटलं होतं. तसेच युट्यूबवर अश्लील सामुग्री दाखवल्याबद्दल गुगल इंडियाकडून 75 लाख रुपये भरपाई देण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली होती. युट्यूबवरील जाहिरात पाहिल्यानंतर परीक्षेवेळी अभ्यासातून मन उडालं आणि त्यामुळे परीक्षेत नापास व्हावं लागलं. त्यामुळेच त्याने कोर्टाकडे ही भरपाई मागितली होती. पण कोर्टाने याचिकेवर विचार करण्यासही नकार दिला.

Manganga

 

दरम्यान, तुम्हाला जाहिरात आवडत नाही तर पाहू नका. तुम्ही जाहिरात का पाहिली? हा काय तुमचा विशेषाधिकार आहे?, अशा कडक शब्दात कोर्टाने याचिकाकर्त्याला बजावलं आहे.व या याचिकेमुळे कोर्टाचा वेळ वाया गेला आहे. त्यामुळे याचिकाकर्त्याला 25 हजाराचा दंड ठोठावण्यात येत असल्याचं कोर्टाने म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!