बल्गेरिया: प्रसिद्ध भविष्यकार बाबा वेंगा हिने 2023 सालासाठी काही मोठ्या भविष्यवाण्या केल्या आहेत. बाबा वेंगा यांनी काही दशकांपूर्वी केलेल्या भाकितानुसार 2023 मध्ये देशात आणि जगात अनेक मोठ्या घटना घडू शकतात. बाबा वेंगा यांनी 2023 या वर्षासाठी कोणकोणत्या भविष्यवाण्या केल्या आहेत ते जाणून घेऊया.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बाबा वेंगा यांच्या मते, 2023 मध्ये पृथ्वीवर एक धोकादायक सौर वादळ येऊ शकते. हे वादळ असे असेल की त्यामुळे पृथ्वीवर प्रचंड विध्वंस होऊ शकेल आणि असे वादळ याआधी कधीच पाहिलेले नसेल. तसेच त्यांनी अणुस्फोट होण्याची धोकादायक भविष्यवाणीही केली आहे. तसेच, 2023 मध्ये एलियन्स पृथ्वीवर येऊ शकतात. याशिवाय बाबा वेंगा यांनी असेही सांगितले होते की, 2023 मध्ये मुलांना प्रयोगशाळांमध्ये विकसित केले जाईल.

दरम्यान, बाबा वेंगा यांनी अनेक शतके भविष्यवाणी केली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार 2022 या वर्षाबद्दल बोलायचे झाले तर त्याचे 80 टक्के अंदाज खरे ठरले आहेत.