उत्तर प्रदेश : अमरोहा जिल्ह्यात एकाच रात्री दोन वेळा शरीर संबंध ठेवण्यास पत्नीने नकार दिल्याने पतीने तिची गळा आवळून हत्या केली.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, रुखसान नावाच्या महिलेसोबत अनवर याचं 2013 साली लग्न झालं होतं. रुखसार आणि अनवर यांना 3 मुलं आहेत. अनवर आपल्या घराच्या तळमजल्यावर एक बेकरीचं दुकान चालवतो. तर कुटुंब पहिल्या मजल्यावर राहत होते. 5 डिसेंबर रोजी आरोपी पतीने पत्नीला झोपेतून उठवलं होतं आणि सेक्सची इच्छा व्यक्त केली होती. पहिल्यांदा संबंध ठेवून झाल्यानंतर पत्नी झोपी गेली. त्यानंतर पती पुन्हा जागा झाला आणि त्याने पत्नीलाही झोपेतून जागं केलं. यानंतर त्याने केलेल्या मागणीवर पत्नी संतापली होती. यातून त्यांच्यात जोरदार भांडण झालं होतं. भांडणादरम्यान तो एक दोरखंड घेऊन आला. याच दोरखंडाने अनवर याने रुखसान हिची हत्या केली. यानंतर त्याने एका पॉलिथीनच्या मोठ्या गोणीत पत्नीचा मृतदेह भरला आणि 50 किलोमीटर दूर फेकला. आपण केलेलं हत्याकांड उघड होऊ नये म्हणून पती स्वतःच पत्नीची बेपत्ता असल्याची तक्रार देण्यासाठी पोलीस स्थानकात गेला होता.
दरम्यान, मुरादाबाद पोलिसांना गेल्या मंगळवारी एका महिलेचा मृतदेह आढळला होता. त्यानंतर मुरादाबाद पोलीस या हत्येप्रकरणी अधिक तपास करत होती. त्या दरम्यान, सापडलेला मृतदेह रुखसानचा असल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांना अनवर याच्यावर संशय बळावला.पोलिसांच्या चौकशीदरम्यान अनवर याने आपणच ही हत्या केल्याची कबुली दिली.