नाशिक : नाशिक डीजीपीनगर परिसरात सख्या मुलीलाच आपल्या वासनेचा बळी एका पित्याने बनवत तब्बल सात वर्षे बदनामीची धमकी देत अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान याप्रकरणी नराधम बापाला अटक करण्यात आली आहे.
मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार, अंबड परिसरातील डीजीपीनगर परिसरात 2016 पासून 2022 पीडित मुलीची आई, बहीण आणि भाऊ नसल्याचे फायदा घेत पित्यानेच सलग सात वर्षांपासून लैंगिक अत्याचार केला. तसेच, आपलीच बदनामी होईल म्हणून पीडित मुलीला पित्याकडून धमकी दिली जात होती.

दरम्यान, बापाच्या लैंगिक अत्याचाऱ्याच्या वेदना असह्य झाल्याने पीडित मुलीने अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरून अंबड पोलीसांनी वडिलाविरोधात पोक्सो कायद्या अंतर्गत बलात्कारचा गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे.