सांगली :“फडणवीस यांच्यावर जीव ओवाळून टाकला तरी कमी पडेल, शेवटच्या श्वासापर्यन्त…..”: ‘या’ नेत्याचे मोठे वक्तव्य!
सांगली : देवेंद्र फडणवीस यांनी सदाभाऊ खोत यांना आमदारकी पासून डावलले, त्यांना कुठेही संधी दिली नाही अशी चर्चा सुरू असतांना सदाभाऊ खोत यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
व्हिडिओ शेअर करत म्हटले कि , भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शेवटच्या श्वासापर्यन्त राहील. त्यांच्यावर जीव ओवाळून टाकला तरी कमी पडेल, देवेंद्र फडणवीस हे सामान्यासाठी लढत असतात. प्रस्थापिता विरोधात आणि घराणेशाही विरोधात त्यांचा लढा कायम आहे.अशा नेत्यांच्या सोबत आम्ही शेवटपर्यंत राहणार आहे आणि रयत क्रांती संघटना ही त्यांच्याबरोबरच घटक पक्ष म्हणून जोडली गेली आहे. त्यामुळे अशा नेत्यांबरोबर मी शेवटपर्यंत राहणार असल्याचा विश्वास माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केला आहे.
दरम्यान, सदाभाऊ खोत यांनी शेअर केलेला व्हिडिओ त्यांच्या टीकेवर दिलेलं उत्तर आहे का ? सदाभाऊ खोत यांनी फडणवीस यांना मी तुमच्यापासून दूर जाणार नाही हे सांगायचे होते का ? अशा विविध चर्चा या निमित्ताने सुरू होणार आहे.