ठाणे:शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री दीपक केसरकर हे कल्याण येथे आले असता त्यांनी मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी मुंबई महापालिकेत शिंदे गट आणि भाजपची युती होणार म्हणत सुषमा अंधारेबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.
केसरकर म्हणाले, “राष्ट्रवादीने ठाकरे गटाला संपवण्याचा कार्यक्रम हाती घेतलाय. अर्धी शिवसेना संपवली. आता उरलेली संपवायला सुषमा अंधारेंना पाठवलं आहे, असा दावा करतानाच सुषमा अंधारे या पूर्वी काय काय बोलल्या आहेत, हे जनतेसमोर आलं पाहिजे,असे वक्तव्य दीपक केसरकर यांनी केले.
तसेच ते पुढे म्हणाले, “काही लोकांना बोलता येतं. काही लोकांना कृती करता येते. ज्यांनी सीमा भागाच्या सुविधा बंद करून ठेवल्या होत्या, त्यांना असं बोलणं शोभत नाही. आम्ही सुविधा सुरू केल्याच, पण कोर्टातल्या केसलाही गती दिली. सीमाभागाचं राजकारण पेटवून राजकारण करणाऱ्यांचा महाराष्ट्रानं विचार करण्याची गरज, असे म्हणत दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.