महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद: पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत आज दोन्ही राज्यांच्या खासदारांची बैठक: काय तोडगा निघणार?
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक या दोन राज्यांमधील सीमावाद उफाळून आला आहे. यावर विरोधकांकडून सरकारने या वादावर तातडीने तोडगा काढावा अशी मागणी केली जात आहे. दरम्यान, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच या प्रकरणात मध्यस्थी केली आहे.
माहितीनूसार, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीमावादाची गंभीर दखल घेतली असून दोन्ही राज्यांमधील खासदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत महाराष्ट्रातून प्रामुख्याने काँग्रेस आणि शिवसेनेचे खासदार उपस्थित राहणार आहे. याशिवाय कर्नाटकातील खासदारही बैठकीला उपस्थित राहतील.
दरम्यान, या बैठकीत सीमावादावर काय तोडगा निघणार? याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.