नवी दिल्ली: गेल्या 24 तासांत जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेल्या घसरणीमुळे सरकारी तेल कंपन्यांनी शुक्रवारी जाहीर केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतींवर त्याचा परिणाम दिसून येत आहे. आज दिल्ली-मुंबईसारख्या देशातील चारही महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर खालीलप्रमाणे:
दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर.
मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर.
चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर.
कोलकात्यात पेट्रोल 06.03 रुपये. डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर.