मुंबई: गुजरात विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खास अभिनंदन केले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ‘ गुजरात विजयाबद्दल मी भारतीय जनता पक्ष व पंतप्रधान मोदी यांचे खास अभिनंदन करतो. गुजरातचा विजय विक्रमी आणि ऐतिहासिक आहे’.

तसेच ते पुढे म्हणाले, ‘गुजरातचा निकाल अपेक्षितच होता. गुजरात निवडणूक ही पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींच्याच नेतृत्वाखाली लढवण्यात आली. त्यामुळेच जनतेने भाजपला भरघोस मतदान केले. त्या विजयात महाराष्ट्रातून पळवलेले मोठे उद्योगही फळले असावेत असे दिसते’, असे ठाकरे म्हणाले.