मुंबई:सोशल मीडियावर ‘व्हायरल गर्ल’ उर्फीच्या हटके स्टाईलने आता नवा उच्चांक गाठला आहे. नेहमीच नवनवीन प्रयोग करत प्रसिध्दीझोतात राहणाऱ्या उर्फीचा नवीन लूक समोर आला आहे.
या नव्या लूकमध्ये उर्फीने हिरव्या रंगाच्या जाळीदार ड्रेसने स्वता:ला तोंडापासून पायापर्यंत झाकले आहे. यासह उर्फीने चॉकर नेकलेस कॅरी केला आहे. न्यू सी- थ्रू ड्रेसमध्ये कॅमेरासमोर मोहक पोझ देताना उर्फी टिपली गेली आहे. सध्या सोशल मीडियावर उर्फीचा न्यू लूक तूफान व्हायरल होत आहे.

दरम्यान, उर्फीच्या न्यू लूकवर काही तासातंच हजारो लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. एका यूजरने, हिरव्या पालेभाज्या. तर तिथे दुसऱ्याने हा काय मूर्खपणा आहे. तर आणखी एकाने उर्फीचा ड्रेस म्हणजे जणू मच्छरदाणी अस म्हटले आहे.