नाशिक: नाशिक-सिन्नर महामार्गावर एसटी बसने तीन ते चार दुचाकीस्वारांना चिरडत पेट घेतला आहे. या अपघातात चार ते पाच जणांचा मृत्यू झाल्याची प्राथामिक माहिती समोर आली आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, नाशिक-सिन्नर महामार्गावर शिंदे-पळसे टोल नाक्याजवळ भरधाव वेगात येणाऱ्या बस चालकाचं एसटी बसवरील नियंत्रण सुटलं आणि बसने समोरून येणाऱ्या तीन ते चार दुचाकींना चिरडलं. यांनतर बसने समोर असलेल्या एका एसटी बसला देखील जोरदार धडक दिली. या धडकेत चार ते पाच दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे तर बसमधील काही प्रवासी जखमी झाले आहेत. या भीषण अपघातानंतर एसटी बसने अचानक पेट घेतला. या अपघातात आतापर्यंत चार ते पाच दुचाकीस्वारांचा जणांचा मृत्यू झाला असून बसमधील अनेक प्रवाशी गंभीर झाले आहेत.

दरम्यान, या भीषण अपघाताची माहिती मिळताच, स्थानिक नागरिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.