मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना कन्नड रक्षण वेदिकेने हल्ला करण्याची धमकी दिली आहे.त्यावर संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधत थेट इशारा दिला आहे.
राऊत म्हणाले, “कन्नड वेदिका धमक्या देत आहेत, त्यांनी माझ्यावर हल्ला करू असं म्हंटले आहे आणि तुम्ही शांत बसला आहेत, बेळगावमध्ये माझ्यावर हल्ला झाला तर तो माझा नाही माझा नसून महाराष्ट्रावर हल्ला असेल असा इशारा राऊत यांनी दिला आहे.

तसेच ते पुढे म्हणाले, मी कुणाकडे बोलायला जात नाही, तुम्ही माझ्याकडे येतात मी त्याचे स्वागत करतो. पत्रकार परिषद होऊ देणार नाही म्हणताय ही भाषा कर्नाटक लोकांची भाजप नेते बोलत आहेत. षण्ड ह्या शब्दाचा अर्थ शब्द कोशात बघून घ्या, ज्याला काहीही जमत नाही त्याला म्हणतात, असेहि संजय राऊत यांनी ठणकावले आहे.
दरम्यान, कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमा वाद अधिकच चिघळला आहे. केंद्रातील सभागृहातही याचे पडसाद उमटतांना दिसून येत आहे.