दिल्ली : दिल्लीमध्ये एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.पश्चिम दिल्लीतील पंजाबी बाग परिसरात बुधवारी सायंकाळी एका सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. तपासासाठी गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. पोलीस पथकाने सुटकेस उघडली असता एका महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, महिलेचे वय अंदाजे 28-30 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. सुटकेसमध्ये मृतदेह असल्याने या प्रकरणात खुनाची बाब स्पष्टपणे दिसून येत आहे. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे.
रिंगरोडजवळील एका नाल्यात महिलेचा मृतदेह आढळून आला. हा नाला नजफगढ नाल्याचा एक भाग असल्याचे सांगण्यात येत आहे. बाजूला एका सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला.

मृतदेहाची स्थिती अत्यंत बिकट असून, त्यामुळे आठ ते दहा दिवसांपूर्वी खून झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अद्याप महिलेची ओळख पटलेली नाही. या महिलेची ओळख पटवून देण्याचे प्राथमिक आव्हान पोलिसांसमोर आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.