अकोला: अकोल्यातील रामदास पेठ पोलिस स्टेशनच्या हद्दीत एका नराधम मित्रानेच मित्राच्या बायकोवर बलात्कार केला आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, 31 वर्षीय पीडित महिला ही तिच्या पती व लहान मुलासोबत रामदास पेठ पोलिस स्टेशन परिसरात पीडितेच्या घरी खैर मोहम्मद प्लॉट परिसरातील रहिवासी शेख रिजवान शेख अहमद याचे येणे-जाणे सुरू राहायचे. 3 जुलै रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास शेख रिजवान याने पीडितेच्या घरात प्रवेश करत पीडितेला मारहाण केली, तसेच पीडितेला धमकी देत, तिच्यावर अत्याचार केला. यानंतर, तीन वेळा आरोपीने पीडितेवर अत्याचार केला. दरम्यान, 4 डिसेंबर रोजी आरोपी शेख रिजवान याने अमरावती येथील मुजफ्फरनगर येथील रहिवासी असलेल्या इमरान खान रमजान खान नामक मित्रासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले. तसे न केल्यास पीडितेचे अश्लील व्हिडीओ, तसेच छायाचित्र काढून संसार उद्ध्वस्त करण्याची धमकी देत, पीडितेवर दोघांनी अत्याचार केला.

दरम्यान, दोघांच्या अत्याचाराला कंटाळून पीडित महिलेने पतीसोबत रामदासपेठ पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल करत गुन्हा दाखल करण्यात आला.