मुंबई: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. बुधवारी दिवसभरात राऊतांना धमकीचे दोन फोन आले.
माहितीनुसार, बुधवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी पत्रकारपरिषद घेत महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नावरन शिंदे गटावर टीका केली होती. राज्यातील शिंदे सरकार हे नामर्दाचं सरकार असल्याचं संजय राऊत म्हणाले होते. दरम्यान, संजय राऊत यांच्या पत्रकारपरिषदेनंतर शिंदे गटाचे नेते शंभुराजे देसाई यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेतली.या पत्रकार परिषदेनंतर राऊतांना धमकीचे फोन आल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, हे धमकीचे फोन कन्नड रक्षण वेदिकेकडून आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.