Latest Marathi News

BREAKING NEWS

आटपाडी : दिघंची ग्रामपंचायतसाठी तिरंगी लढत

आटपाडी : आटपाडी तालुक्यातील एकूण २६ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरु झाली आहे. काल अर्ज माघारीनंतर ग्रामपंचायत लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून तालुक्यातील महत्त्वाच्या असणाऱ्या दिघंची ग्रामपंचायतसाठी तिरंगी लढत होणार आहे.

0 1,400

सत्ताधारी शिवसेनेचचे जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांचा गटाच्या विरोधात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख यांचा गट व भारतीय जनता पक्षाच्या वतीने आम. पडळकर व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांच्या गटाची लढत होणार आहे.

Manganga

मागील पंचवार्षिक थेट सरपंचपदासाठी झालेल्या लढतीमध्ये शिवसेनेच्या अमोल मोरे यांनी भाजप व राष्ट्रवादीशी लढत देत थेट सरपंचपद मिळविले होते. तर राष्ट्रवादी दुसऱ्या व भाजप ला तिसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेसने थेट सरपंचपदासाठी पराभव झाला असला तरी सर्वात जास्त सदस्य त्यांचे निवडून आले होते. परंतु उपसरपंचपदासाठी झालेल्या निवडीसाठी मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

परंतु आता मात्र राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांनी मोठी मोर्चा बांधणी केली असली निवडून येण्यासाठी मात्र मोठी मेहनत करावी लागणार असून सत्ताधारी शिवसेनेला सत्ता राखण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!