Latest Marathi News

आटपाडी तालुक्यात सरपंचपदासाठी ७७ तर सदस्यपदासाठी ३३९ अर्ज माघारी : कोणत्या गावातून किती अर्ज माघारी घेतले वाचा बातमी सविस्तर

टपाडी तालुक्यातील २६ ग्रामपंचायतसाठी थेट सरपंचपदासाठी ७७ तर सदस्यपदासाठी ३३९ उमेदवार यांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत.

0 1,450

आटपाडी : आटपाडी तालुक्यातील २६ ग्रामपंचायतसाठी थेट सरपंचपदासाठी ७७ तर सदस्यपदासाठी ३३९ उमेदवार यांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत.

आटपाडी तालुक्यातील एकूण २६ ग्रामपंचायतसाठी निवडणूक प्रकिया सुरु झाली आहे. काल अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे तहसीलदार कार्यालयाचे आवर गर्दीने फुलून गेले होते. अर्ज माघारी घेण्यासाठी मोठ्या प्रमाणत नेते कार्यकर्त्यांना विनवणी करताना दिसत होते.

Manganga

आवळाई ग्रामपंचायत सरपंचपदासाठी ५ तर सदस्यपदासाठी २१, माळेवाडी ग्रामपंचायत सरपंचपदासाठी ५ तर सदस्यपदासाठी ७, यपावाडी ग्रामपंचायत सरपंचपदासाठी ४ तर सदस्यपदासाठी २६, जांभूळणी सरपंचपदासाठी ३ तर सदस्यपदासाठी ११, हिवतड ग्रामपंचायत सरपंचपदासाठी ४ तर सदस्यपदासाठी ६, राजेवाडी ग्रामपंचायत सरपंच पदासाठी ३ तर सदस्यपदासाठी १०, गोमेवाडी सरपंचपदासाठी ३ तर सदस्यपदासाठी १२, कौठुळी सरपंचपदासाठी ३ तर सदस्यपदासाठी १८, पळसखेल ग्रामपंचायत सरपंचपदासाठी २ तर सदस्यपदासाठी १४, झरे ग्रामपंचायत सरपंचपदासाठी २ तर सदस्यपदासाठी ६, घाणंद ग्रामपंचायत सरपंचपदासाठी १ तर सदस्यपदासाठी ४, कामथ ग्रामपंचायत सरपंचपदासाठी १ तर सदस्यपदासाठी ३, पारेकरवाडी ग्रामपंचायत सरपंचपदासाठी ३ तर सदस्यपदासाठी २, पडळकरवाडी ग्रामपंचायत सरपंचपदासाठी २ तर सदस्यपदासाठी ०, पुजारवाडी दि. ग्रामपंचायत सरपंचपदासाठी ४ तर सदस्यपदासाठी २७, पिंपरी बु. ग्रामपंचायत सरपंचपदासाठी १ तर सदस्यपदासाठी ८, दिघंची ग्रामपंचायत सरपंचपदासाठी ५ तर सदस्यपदासाठी ५०, तडवळे ग्रामपंचायत सरपंचपदासाठी ४ तर सदस्यपदासाठी १३, उंबरगाव ग्रामपंचायत सरपंचपदासाठी २ तर सदस्यपदासाठी १३, खरसुंडी ग्रामपंचायत सरपंचपदासाठी १० तर सदस्यपदासाठी २५, गळवेवाडी ग्रामपंचायत सरपंचपदासाठी ३ तर सदस्यपदासाठी २६, लिंगीवरे ग्रामपंचायत सरपंचपदासाठी २ तर सदस्यपदासाठी ६, वलवण ग्रामपंचायत सरपंचपदासाठी २ तर सदस्यपदासाठी ९ उमेदवार यांनी अर्ज माघारी घेतले आहेत.

त्यामुळे अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी सरपंचपदासाठी एकूण ७७ तर सदस्यपदासाठी ३३९ उमेदवार यांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!