Latest Marathi News

सातबाऱ्यावर नाव का नाही? विचारलं अन् नायब तहसीलदारांच्या गालावर मारली चापट!

0 565

नाशिक: नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा सुरगाणा तालुक्यातील हट्टी येथील तहसील कार्यालयात संशयिताने जमीनीच्या सातबाऱ्यावर इतर जणांची नावं कशी आली? त्यात माझं नाव का नाही? असा जाब विचारत नायब तहसीलदार यांची कॉलर पकडून गालात चापट मारल्यानं या व्यक्ती विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. भारत गुलाब पवार असं या संशयितांचं नाव आहे.

 

नायब तहसीलदार राजेंद्र मोरे यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे, दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास नायब तहसीलदार मोरे हे निवडणूक शाखेत बसून शासकीय कामकाज करीत होते. यावेळी पवार यानं सोबत हट्टी गाव शिवारातील गट नंबर 50 चा उतारा मोरे यांना दाखविला. सदर उताऱ्यावर माझं नाव का कमी केलं? तसेच उताऱ्यात इतर लोकांची नावं कशी आली? त्यावर उताऱ्यात तुझ्या वडिलांचं नाव असून त्यांच्या पश्चात तुमचं नाव लागेल. त्यासाठी लेखी अर्ज करा असं सांगण्यात आले आहे. त्यावेळी पवार यास राग येऊन त्यानं मोरे यांना शिविगाळ करत कॉलर पकडून गालात चापट मारल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.

Manganga

 

 

दरम्यान, हा प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!